देसाईगंज (गडचिरोली) : येथील आदर्श महाविद्यालयाचे प्रा.उमाकांत हुलके यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मधूबन कॉलनीमधील त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात नेमके काय आहे हे कळू शकले नाही. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून ते प्रकृतीच्या कारणाने त्रस्त होते आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते शिक्षणासाठी नागपूरला राहतात. देसाईगंज पोलीस अधिक तपास करत आहे.
प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:19 IST