शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोळी झाडून एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 18:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी (जि. गडचिरोली) : सुटी न मिळाल्याने राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वत:वर बंदूकीची गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी पोलीस उपमुख्यालयात घडली. किरण कांबळे असे जखमी जवानाचे नाव आहे.किरण कांबळे हा राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १० ‘अ’ तुकडीमध्ये कार्यरत ...

ठळक मुद्देसुटी मिळाली नाही अहेरी पोलीस उपमुख्यालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी (जि. गडचिरोली) : सुटी न मिळाल्याने राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वत:वर बंदूकीची गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी पोलीस उपमुख्यालयात घडली. किरण कांबळे असे जखमी जवानाचे नाव आहे.किरण कांबळे हा राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १० ‘अ’ तुकडीमध्ये कार्यरत असून तो अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कर्तव्यावर होता. त्याने घरी जाण्यासाठी वरिष्ठांना सुटी मागितली होती. मात्र वरिष्ठांनी सुटी दिली नाही. परिणामी रागाच्या भरात त्याने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. गोळी झाडल्यानंतर त्याला तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला गडचिरोली येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.या घटनेबाबत एसआरपीएफ अधिकारी व पोलीस अधिकाºयांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वी १७ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्रात तैनात असलेल्या बी. हनुमंतू या सीआरपीएफ जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली होती.नक्षलविरोधी अभियान राबविताना जंगलात रात्रभर मुक्काम करावा लागतो. दिवसभर कित्येक किमीची पायपीट करावी लागते. त्यातच सुट्या मिळत नसल्याने जवान तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या