गडचिरोली : जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज २० जानेवारी २०१७ पर्यंत महाविद्यालयात सादर करावेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडील प्राप्त परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह २५ जानेवारी २०१७ पर्यंत सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती अर्जासोबत आधार कार्ड, बँक खात्याशी संलग्न केल्याची पावती व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावेत, तसेच आधार कार्डशी संलग्न केलेला बँक खाते क्रमांक शिष्यवृत्तीच्या अर्जात दर्शविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयाची राहिल, असे सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे. याबाबत शुक्रवारी प्राचार्याची सभा घेण्यात आली होती.
२० पर्यंत शिष्यवृत्तीचे परिपूर्ण अर्ज सादर करा
By admin | Updated: January 15, 2017 01:40 IST