सत्यनारायण गद्देवार यांची मागणीअहेरी : वन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या सत्रात खोदतळे व खोल सलग समतळ चराचे कामाकरिता १७ मे २०१५ ला जाहिरात काढण्यात आली होती. २० मे २०१५ ला निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. ३५ कंत्राटदारांनी यात भाग घेतला. ३५ नोंदणीकृत ठेकेदारांना डीपसीटी ८८ रनिंग मीटर व खोदतळे १ लाख १४ हजार रूपये प्रमाणे ३५ नोंदणीकृत अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानुसार कामही सुरू करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांनी ४ जून २०१५ ला नवीन कंत्राटदारांची नोंदणी बेकायदेशिरपणे केली. अशा कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सत्यनारायण गद्देवार यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली आहे. काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून कामे संपली म्हणून स्वत: गाडी लावून त्याची गाडीची नोंदणी रेंज आॅफीसकडून करून रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही गद्देवार यांनी केला आहे.
नवीन कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा
By admin | Updated: July 1, 2015 01:56 IST