शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेने विद्यार्थी त्रस्त

By admin | Updated: July 20, 2015 01:45 IST

ंवेबसाईटमध्ये अडचणी : ६५० विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी

लोकमत विशेषगडचिरोली : सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुला, मुलींच्या जिल्ह्यातील पाच शासकीय वसतिगृहात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर गडचिरोली येथील वसतिगृह तसेच शाळा महाविद्यालयाच्या नावाचा उल्लेख येत नसल्याने आॅनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हार्डकॉपी स्वरूपात अर्ज करून प्रवेशाबाबतची नोंदणी करीत आहेत.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया गतवर्षीपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाचे आरमोरी, गडचिरोली, अहेरी, नवेगाव, चामोर्शी आदी सहा ठिकाणी मुलांचे तीन व मुलींचे तीन असे एकूण सहा शासकीय वसतिगृह आहेत. या सहा वसतिगृहाची विघार्थी प्रवेश क्षमता एकूण ५२५ आहे. यापैकी वसतिगृहांमध्ये सध्या गतवर्षीचे ३१४ विद्यार्थी व विद्यार्थिनी दाखल आहेत. सहा वसतिगृह मिळून एकूण २११ जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या या जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. प्रवेश नोंदणीकरिता समाज कल्याण विभागाने ँ३३स्र२://ेंँंी२ूँङ्मङ्म’.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे. सदर वेबसाईट उघडल्यानंतर त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील समाज कल्याणचे वसतिगृह , इयत्ता व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शाळा महाविद्यालयाच्या नावाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे प्रवेशासाठी जिल्ह्यातील कोणते वसतिगृह निवडावे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. ६ जुलै पासून चार ते पाच दिवस समाज कल्याणच्या वेबसाईटवर प्रचंड अडचणी होत्या. त्यामुळे पाच ते सहा दिवस एकाही विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी झाली नाही. त्यानंतर पुणेच्या समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती केली. आतापर्यंत पाच वसतिगृहातील २११ रिक्त जागासांठी जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता आॅनलाईन नोंदणी केली आहे. तर पाचही वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे जवळपास १५० विद्यार्थ्यांचे हार्डकॉपी स्वरूपात प्रवेश अर्ज प्राप्त झाले. (स्थानिक प्रतिनिधी)जागा रिक्त राहूनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश नाहीसमाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ८० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २० टक्के प्रवेश इतर व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. गतवर्षी २०१४-१५ या सत्रात चामोर्शी मार्गावरील शासकीय वसतिगृहात वर्ग ११ वी विद्यार्थ्यांच्या ११ जागा रिक्त होत्या. या सर्व जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होत्या. प्रवेशाच्या रिक्त जागा राहूनही इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांना गतवर्षी या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला नाही. समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन ओबीसी, एनटी व इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपटजिल्ह्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील अनेक गुणवंत, गरजू व गरीब विद्यार्थ्यांनी शहरातील शाळा महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. नातलग तसेच भाड्याने खोली घेऊन शाळा महाविद्यालयात जावे लागत आहे.