शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:03 IST

आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.

ठळक मुद्देभामरागड येथे मेळावा : एसडीओंचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथे बुधवारी वनविभागाच्या पटांगणात विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार कैलास अंडील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. भूषण चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश मदने उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमटी मोडी धुर्वा, आरमोरीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पीएसआय नैताम उपस्थित होत्या.मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याचे संचालन पीएसआय झोल तर आभार राजरत्न खैरनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.या मेळाव्याला भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा, राजे धर्मराव हायस्कूल, जय पेरसापेन माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालय, मॉडेल स्कूल, लोकबिरादरी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सवलतींची दिली माहितीउपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागडच्या वतीने आयोजित विद्यार्थी मेळाव्यात शहरातील संपूर्ण शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी भाषेपेक्षा गोंडी भाषा अधिक प्रभावीपणे बोलता व समजत येत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमटी धुर्वा, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, पीएसआय नैताम यांनी स्थानिक गोंडी भाषेतून मार्गदर्शन केले. तसेच त्यांना आदिवासी विकास विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनांची माहिती दिली.