पेटतळा येथे युवा मित्र संघटनेतर्फे कार्यक्रम
घाेट : वीर छत्रपती शिवाजी युवा मित्र संघटनेच्या वतीने पेटतळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे पदाधिकारी विजय शृंगारपवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पेटतळाचे पोलीसपाटील जयेंद्र बर्लावार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, शिवसेना संघटक नंदू कुमरे, सरपंच शोभा कन्नाके, उपसरपंच ओमप्रकाश बर्लावार, माजी सरपंच रमेश कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गेडाम, सावित्री पेंदाम, मुख्याध्यापक वासुदेव कुनघाडकर, योगराज मडावी, महेश ओल्लालवार, पत्रकार हेमंत उपाध्ये उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी चौकात भगवा ध्वज फडकविण्यात आला. तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. गावाच्या विकासासाठी शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारावे, असे प्रतिपादन विजय शृंगारपवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश चौधरी यांनी केले. परितोष हलधर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष गंगाधर तुंकलवार, दुर्गम मुसद्दीवार, संभाजी तुंकलवार, दिलीप मुसेद्वीवार, दिगांबर आत्राम, राजू चौधरी, सुजित चौधरी, भूपेश बर्लावार, संतोष चौधरी, विनोद तुंकलवार, प्रकाश तोकलवार, रेवत कन्नाके, नरेश पेंदाम, प्रवीण सिडाम यांनी सहकार्य केले.