सोमकुवर : आलापल्ली येथे शिबिराचा समारोप अहेरी/आलापल्ली : समाजसेवेत देशात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून तांत्रिक शिक्षण घेताना समाजातही सेवा करण्याची संधी मिळत असते. या संधीतून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष ज्ञान ंअंगिकारून करावा, असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए. ई. सोमकुवर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून सोमकुवर बालत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार पी. आर. घोरूडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आयएमसी चेअरमन ए. आर. खान, प्राचार्य एस. आर. ढोंगे, केळकर, कोठारे, रणदिवे उपस्थित होते. शिबिराप्रसंगी विद्युत तपासणी, योग शिबिर, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात पूजा ठाकरे, सतीश सडमेक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ए. आर. खान, एन. टी. खोब्रागडे, आर. एम. अग्रवाल, लोने, प्रा. डॉ. नीलिमा सिंग यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान प्रत्येक दिवशी विविध विषयावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी घेतला. प्रास्ताविक व संचालन प्रियंका मेडपल्लीवार तर आभार संगीता वनकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी आसिफ, बल्लो, राठोड, तितीरमारे, अंबादे, बुराण, सोरते यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी शिबिरातील ज्ञान अंगिकारावे
By admin | Updated: January 15, 2017 01:43 IST