शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

युवकासह विद्यार्थ्याचा विषारी दारूने मृत्यू?, कामावरून परतल्यानंतर बिघडली प्रकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:27 IST

शेजारच्या गावातून कामावरून परतल्यानंतर एका युवकासह दहावीतील विद्यार्थ्याची प्रकृती बिघडून त्यांचा उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला.

कोरेगाव चोप (गडचिरोली) : शेजारच्या गावातून कामावरून परतल्यानंतर एका युवकासह दहावीतील विद्यार्थ्याची प्रकृती बिघडून त्यांचा उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री देसाईगंज तालुक्यातील बोडदा या गावी घडली. गोपाल कोमराम शिंदे (२५) आणि स्वप्नील देवानंद डहारे (१६), दोघेही रा.बोडदा अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही बोडदापासून २ किलोमीटरवर असलेल्या नदीपलिकडील गोंदिया जिल्ह्यातल्या गावात कामासाठी गेले होते.गोपाल हा धानाच्या कोंडा डुलाईसाठी तर स्वप्नील विटांच्या डुलाईसाठी गेला होता. सायंकाळी दोघेही कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नदीपलीकडील गावात हातभट्टीची दारू गाळली जाते. सदर दोघांनीही कामावरून घरी परतण्यापूर्वी दारू प्राशन केल्याची चर्चा आहे. प्रकृती बिघडल्यानंतर दोघांचीही लक्षणं सारखीच होती.अनेक विद्यार्थी व्यसनपूर्तीसाठी शाळेत न जाता कामावर जाऊन पैसे कमावतात आणि ते व्यसनांमध्ये उडवतात, अशा आशयाचे वृत्त काही दिवसांपूर्वीच लोकमतने प्रकाशित केले होते. मात्र दारू गाळणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी दुपारी दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. स्वप्नील हा किसान विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता तर गोपाल विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी व आई-वडील असा परिवार आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून बीट अंमलदार अशोक क-हाडे अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली