शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विद्यार्थ्यांनी रॅलीतून घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन, गडचिराेलीकरांचे पारणे फिटले

By दिलीप दहेलकर | Updated: December 31, 2023 19:37 IST

धार्मिक सलोखा, एकात्मता, पर्यावरण जागृतीवर भर

गडचिरोली: दहा दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर 'आव्हान' गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या सातव्या दिवशी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हानची रॅली आरमाेरी मार्गावरील सभागृहापासून शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत निघाली. तत्पूर्वी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी मशाल पेटवून तसेच रॅलीला हिरवा झेंडी दाखवून रवाना केले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रॅलीतून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले.

शुभारंभाप्रसंगी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तथा शिबिराचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, सहसमन्वक डॉ. प्रिया गेडाम, एनडीआरएफचे निरीक्षक पंकज चौधरी, नागपूर विद्यापीठाचे परीक्षक सतिश चाफले, जळगाव विद्यापीठाचे परीक्षक सचिन नाद्रे, नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक सोपानदेव पिसे, गडचिरोली जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.श्रीराम गहाणे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक विजया गेडाम, विभागीय समन्वयक उषा खंडाळे, डॉ. पवन नाईक, डॉ. गुरुदास बल्की,प्रदीप चाफले आदी उपस्थित होते.धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक विषयांची हाताळणी करणारे देखावे, नृत्य, पोस्टर्स, विविध विषयांवरील फलक आणि सजीव देखावे या वेळेला राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यातून विविधतेतून एकता आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

वाहतुकीला कुठलीही अडचण निर्माण न होऊ देता अगदी व्यवस्तीतरित्या ही रॅली आरमाेरी मार्गावरून इंदिरा गांधी चौक, पुढे शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा सभागृहात विसर्जित करण्यात आली. या संपूर्ण रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महाराष्ट्राच्या २२ विद्यापीठांमधील एक हजार विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये ३७ पुरुष संघ व्यवस्थापक, ३७ महिला संघ व्यवस्थापकांचा समावेश होता. रॅलीच्या यशस्वीसाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

समाजसेवकांची साकारली वेशभूषाया रॅलीत गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रेला नृत्य तसेच समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची वेशभूषा , झाडीपट्टी रंगभूमीवर पोस्टर, डाॅ. अभय बंग, बाबा आमटे यांचे कार्य, जल, जंगल, जमीनचे महत्व, या भागातील सांस्कृतीक वारसा, येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली