बाॅक्स ...
जिल्ह्यातील एकूण शाळा
१,५५०
मुख्याध्यापकांना कक्ष नसलेल्या शाळा
३५०
स्टाफरूम नसलेल्या शाळा
१,४९५
बाॅक्स ...
शिक्षकांची हाेते दमछाक
काेराेना महामारीची समस्या आटाेक्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. सध्या इयत्ता पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष बंदच आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील जि. प. शाळांमध्ये पुरेशा वर्गखाेल्या नाहीत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. स्टाफरूमचा पत्ता नाही. त्यामुळे शाळेचे विविध साहित्य, दस्तावेज, फर्निचर एका वर्गखाेलीतच काेपऱ्याला ठेवावे लागते. या खाेलीत अध्यापनाचे काम केले जाते. पुरेशा भाैतिक सुविधांअभावी दुर्गम भागातील शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.
बाॅक्स ...
या शाळांमध्ये स्टाफरूमची व्यवस्था
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत १० माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय पाच ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तसेच इतर माेठ्या शाळा मिळून एकूण ३२ ठिकाणी स्टाफरूमची व्यवस्था आहे. इतर शाळांमध्ये स्टाफरूमचा पत्ता नाही.