शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाने विद्यार्थ्यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे.

ठळक मुद्दे१७ जुलैपासून बससेवा बंद : झिंगानूर-सिरोंचा मार्गावरील चिखलामुळे वाहतुकीवर परिणाम

रामचंद्र कुमरी।लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे.हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र अकरावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सिरोंचा या तालुकास्थळी गेल्याशिवाय पर्याय नाही. झिंगानूर येथील आश्रमशाळेत बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी अनेकवेळा होत असली तरी प्रशासन व शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दहावी पास झाल्यानंतर सिरोंचा येथे प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिरोंचा ते झिंगानूरपर्यंतचे अंतर ४० किमी आहे. या ४० किमी अंतरात अनेक नाले व लहान नद्या आहेत. या नाल्यांवर अजूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसात नाल्याच्या ठेंगण्या पुलावरून पाणी राहते. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ध्यावरूनच परत यावे लागते. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करतात. यावर्षी बांधकाम विभागाने काही नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू केले. नागरिकांना ये-जा करण्यासाठी बाजूने रस्ता केला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाला आहे. बससह जड वाहने फसत असल्याने एसटी विभागाने झिंगानूरला जाणारी बस १७ जुलैपासून बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनातून सिरोंचा गाठावे लागत आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मालवाहू वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.झिंगानूर येथील आश्रमशाळेत परिसरातील काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांनाही नदी, नाल्यांचा सामना करत सिरोंचा गाठावे लागते. कोरेतोगू नाल्यावरील पुलाच्या बाजूने तयार केलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच बस फेरी बंद करण्यात आली. परिणामी सर्वांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या भागातील नागरिक अद्याप प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत.

टॅग्स :SchoolशाळाTravelप्रवास