शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी प्रकल्प कार्यालयावर धडकले

By admin | Updated: December 6, 2014 22:47 IST

प्रलंबित देयकामुळे शासकीय वसतिगृहातील पुरवठा कंत्राटदारांनी वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज शनिवारी गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी

गडचिरोली : प्रलंबित देयकामुळे शासकीय वसतिगृहातील पुरवठा कंत्राटदारांनी वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज शनिवारी गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक देऊन रोष व्यक्त केला. संतप्त विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. कार्यालयात शेकडोच्या संख्येने घुसलेल्या या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल खाडे यांच्या नेतृत्वात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन आज आदिवासी विद्यार्थी संघाच्यावतीने प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाहभत्ता तत्काळ अदा करण्यात यावा, विद्यार्थ्यांसाठी असलेली बायोमॅट्रीक प्रणाली बंद करावी, प्रत्येक वसतिगृहात फिल्टर, वाटर हिटर उपलब्ध करून देण्यात यावे, ड्रेसकोडचे बिल त्वरीत मंजूर करावे, आश्रमशाळा वसतिगृहातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, पाठ्यपुस्तके उपलब्ध करावीत यासह विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर स्पष्टीकरण दिले. प्रकल्प कार्यालयाशी निगडित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी दौलत धुर्वे, विकेश आत्राम, संदीप वरखडे, चंद्रशेखर दुग्गा, नितेश किरंगे, भूजंग मडावी, अक्षपाल मडावी, जितेंद्र कुमरे आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.