शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दारू विक्रेत्यांविरूद्ध महिलांची धडाकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:06 IST

कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देदारूसाठा, मोहसडवा व साहित्य जप्तकागदपत्रे रोखून ग्रामपंचायत करणार विक्र ेत्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले.आरमोरी तालुक्यापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू गाळली जाते. त्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही विक्रेते जुमानत नाही. त्यामुळे हे गाव इतरही गावांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मुक्तिपथ अभियानाच्या तालुका टीमने येथे बैठक घेऊन आधी महिलांना संघटीत केले. महिला स्वबळावर दारूविक्री बंद करू शकत असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे गेल्या आठवड्यात येथे गाव संघटन तयार करून महिलांनीच दारूच्या प्रश्नावर विशेष ग्रामसभा बोलविली. या ग्रामसभेत गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. सोबतच २८ दारू विक्रेत्यांची यादी तयार करून त्यांना विक्री बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली. या प्रक्रियेनंतरही गावात दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे दि. १२ रोजी मुक्तिपथ तालुका चमुद्वारे गाव संघटनेला कारवाई करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर महिलांनी गावातील महिला व सूज्ञ लोकांना एकत्रित करून दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. एवढेच नाही तर विक्रेत्यांचे जंगलातील अड्डे शोधून काढत दारू, मोहसडवा आणि ड्रम जप्त केले. गावातील काही पुरु षही या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांनी जप्त केलेली दारू रस्त्यावर ओतून नष्ट केली. मिळालेले साहित्य डोक्यावर उचलून महिलांनी ते चौकात आणले. या अहिंसक कारवाईत कोरेगावच्या सरपंच जिजा उसेंडी, माजी सरपंच बालाजी गेडाम, पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी, गावसंघनेच्या अध्यक्ष सुनीता मडावी, सचिव सुलोचना राऊत यांच्यासह ४० ते ४५ महिला आणि पुरु ष सहभागी झाले होते.दाखले व रेशनपासून ठेवणार वंचितदारूविक्री बंद होण्यासाठी ग्रामपंचायतने कठोर पाऊल उचलत दारूविक्री करीत असलेल्यांना यापुढे रेशनकार्डवर धान्य न देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यासोबतच आवश्यक दाखले आणि कागदपत्रांपासून त्यांना मुकावे लागणार आहे.ग्रामसभेत दारूविक्रेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. नोटीस देऊनही दारूविक्री सुरूच ठेवल्याने विक्रेत्यांना रोजगार हमी योजनेच्या कामावरूनही कमी करण्यात आले आहे. त्यांची यादी रोजगार सेवकांना देऊन मस्टरवरून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी