शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वंचितांची नगर परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे.

ठळक मुद्देमूलभूत समस्यांसाठी आक्रोश : गोकुलनगर, विवेकानंदनगरातील नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शेकडो नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात शुक्रवारी नगर परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांना सादर करण्यात आले. मूलभूत समस्या न सोडविल्यास भविष्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे. घरटॅक्स १० टक्के वाढविला आहे तो कमी करावा. स्वच्छ, शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. भूमीगत गटार पाईपलाईनचे काम करताना एका वार्डातील काम झाल्याशिवाय दुसºया वार्डात सुरू करू नये. ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करावे. फुटपाथधारकांना दुकानगाळे उपलब्ध करून द्यावे. दर आठवड्याला नाल्या साफ कराव्या. कारगिल चौकाच्या जवळून विज्ञान महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण करावे. नगर परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय करावी. आदी मागण्यांसाठी चामोर्शी मार्गावरील पेपरमिल कार्यालय ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गोकुलनगर, विवेकानंदनगर, कैकाडी वस्तीमधील शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या.मुख्याधिकारी जोपर्यंत आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिल्याने मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी काही समस्या १५ दिवसात मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन न.प.च्या वतीने देण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, गजानन कुकुडकर, जी. के. बारसिंगे, माला भजगवळी, नरेश महाडोळे, योगेंद्र बांगरे, गुलाब मुघल, डाकराम वाघमारे, राजेंद्र बांबोळे, धर्मेंद्र गोवर्धन, डॉ. योगेश नंदेश्वर, सीमा दुर्गे, ज्योती जनबंधू, ज्योती दहिकर, गीता भोयर, डी. आर. जांभूळकर, अनिल राऊत, अनिल निकुरे यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी