शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

By संजय तिपाले | Updated: March 11, 2024 18:52 IST

संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

गडचिरोली : पाच वर्षांच्या चिमुकलीवर शासकीय निवासस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना १० मार्च रोजी एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली होती. याचे तीव्र पडसाद जारावंडी येथे ११ मार्चला उमटले. संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने ५ वर्षांच्या मुलीला शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, कुकर्म करताना एका मुलीने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळेमुलीवर तत्काळ उपचार मिळाले नाहीत. तिला गडचिरोलीला आणावे लागले, सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

पीडितेच्या आईच्या जबाबावरून बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ मार्च रोजी जारावंडी येथे कडकडीत बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडकल्यानंतर दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चात आरोपीला फाशीची शिक्षा द्या.. अशी जोरदार घोषणाबाजी करून परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

आरोपी जेरबंददरम्यान, या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी संतोष कोंडेकरला ११ मार्च रोजी जारावंडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास १२ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी सांगितली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली