शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

न्यायाधीशांना पत्र पाठवून जनहित याचिकेला बळ द्या

By admin | Updated: March 13, 2016 01:23 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, ...

पत्रकार परिषद : शंकर धोंडगे यांचे आवाहन गडचिरोली : शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा अशी किंमत शेतमालाला देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांना धरून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांना (नागपूर खंडपीठ) यांना पत्र पाठवावे, असे आवाहन शेतकरी, शेतमजूर कृती समितीचे संयोजक शंकर धोंडगे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. राष्ट्रवादी किसान सभेची बैठक जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती देताना शंकर धोंडगे म्हणाले की, संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चारा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे सततच्या नैराश्याने शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय व हक्कासाठी न्यायालयीन लढाही लढण्याच्या उद्देशाने औरंगाबाद खंडपीठात ५ जानेवारी २०१६ रोजी घटनेच्या कलम २१ अन्वये शेतकरी, शेतमजुरांना माणूस म्हणून जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारावर सरकारकडून अडथळा निर्माण केला जात असल्याबद्दल पुराव्यानिशी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चार आठवड्यात सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागण्यासाठी मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे. पत्राचा नमुना व लिपाफा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केवळ पत्राच्या खाली स्वत:चे नाव, गाव, पत्ता लिहून सही करायची आहे व स्वत:कडचे पाच रूपये खर्च करून पोस्टाचे तिकीट चिकटवायचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे, असे आवाहन शंकर धोंडगे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला किसानसभेचे राज्यकार्यवाह किशोर माथनकर, दत्ता पवार, पक्षनिरिक्षक राजू वैद्य, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, किसानसभेचे अध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अ‍ॅड. संजय ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)