शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी वादळाचा पुन्हा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:07 IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून अहेरी उपविभागात अवकाळी वादळाने थैैमान घातले आहे. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून नुकसान झाले आहे. आता वादळाने उत्तरभाग आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देअर्ध्या जिल्ह्यात धुमाकूळ : शंकरपुरात मुसळधार पाऊस; काटली-साखरादरम्यान झाड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अहेरी उपविभागात अवकाळी वादळाने थैैमान घातले आहे. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून नुकसान झाले आहे. आता वादळाने उत्तरभाग आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. रविवारी आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज तालुक्यालाही अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाने काटली-साखरादरम्यान मुख्य मार्गावर मोठे झाड कोसळल्याने गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती.देसाईगंज - तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या सावंगी-गांधीनगर परिसरात रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गारपीटसह वादळाचा तडाखा बसला. यामुळे गांधीनगर येथील अनेक घरांचे छत कोसळले. काही मार्गावरील झाडे कोसळल्याने वीज तारा तुटल्या. परिणामी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच वादळामुळे देसाईगंज तालुक्यातील जनजीवन प्रभावित झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण देसाईगंज तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. जवळपास दीड तास वादळी पावसाने तालुक्याला झोडपले. गांधीनगर गावाला वादळाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांची टिनपत्रे उडाली. तर घरालगतची झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. गांधीनगर येथील प्रेमदास चहांदे, विनोद चंडिकार, विकास भिमटे, संजय दोनाडकर आदींच्या घराचे मोठे नुकसान झाले. तसेच इतर घरांची अल्प नुकसान झाले.गडचिरोली - रविवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस बरसला. दरम्यान गडचिरोली-आरमोरी मार्गावर काटली-साखरादरम्यान झाड कोसळले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक प्रभावित झाली. दरम्यान झाडाच्या बाजूने वाहतूक सुरूच होती. तशी माहितीही गडचिरोली एसटी आगाराचे प्रमुख मंगेश पांडे यांनी दिली. दरम्यान गोगाव व डांबर प्लॅन्टच्यादरम्यान रस्त्यावर वादळाने झाड कोसळले. मात्र वाहतूक सुरूच होती.विसोरा - उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असताना २० एप्रिल रोजी शनिवारला सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन देसाईगंज तालुक्याच्या विसोरा, शंकरपूर येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. अवकाळी वादळाचाही तडाखा या भागाला बसला. उन्हाळी धानपिकाला फटका बसला. शिवाय आंब्याच्या झाडाला लगडून आलेल्या कैऱ्या पडल्या. अवकाळी वादळीपावसाने या भागात आयोजित करण्यात आलेल्या विवाह समारंभ व स्वागत समारंभांना फटका बसला. त्यामुळे वऱ्हाड्यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणच्या कार्यक्रमातील अन्नाची नासाडी झाली. शनिवारी सायंकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत अवकाळी वादळी पाऊस बरसला. त्यानंतर वीजगर्जना थांबल्या. पुन्हा पहाटे ५ नंतर या भागात दमदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले.गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागाला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.गडचिरोलीत वीज पुरवठ्याचा लपंडावरविवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरासह तालुक्यात वातावरणात बदल होऊन वादळ सुटले. वादळामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर झाडे कोसळली. परिणामी गडचिरोली शहरासह बºयाच गावांचा वीज पुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू होता. उन्हाळ्याच्या दिवसात उकाडा जाणवत होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. ग्रामीण भागात रात्री अनेकदा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.मोसम येथे झाड पडून एक गाय ठार तर पाच जखमीअहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम भागात गुरूवारी अवकाळी वादळी पाऊस बरसला. वादळाने मोसम येथे खूप जुने चिंचेचे झाड कोसळून एक गाय ठर तर पाच जनावरे जखमी झाल्याची घटना घडली. कोसळलेले झाड हे ३०० वर्षांपासूनचे जुने झाड होते. आविसंच्या कार्यकर्त्यांनी झाडाखाली दबलेल्या जनावरांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. वादळामुळे मोसम गावातील अनेक घरांचे छत उडाले. कवेलू फुटल्या. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. यावेळी पाहणीदरम्यान मोसमचे उपसरपंच जगन्नाथ मडावी, श्रीनिवास राऊत, जोगेश मडावी, साईनाथ मडावी, गोरेंतराव सडमेक, दौलत मडावी, रामू मडावी, प्रमोद सिडाम, नामदेव मडावी, श्यामराव चिंचोडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस