शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: July 2, 2016 02:00 IST

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे...

गोंदिया : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मुख्य रस्ता जवळपास अर्ध्या तासापर्यंत थांबवून ठेवण्यात आला. भवन पाडण्यात मुख्य आरोपी रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांना अविलंब अटक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघ या संघटनांच्या जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता. सदर रास्ता रोको आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, समता सैनिक दलाचे कमांडींग आॅफिसर जितेंद्र मेश्राम व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम यांनी सांगितले की, एकीकडे शासन लंडन स्थित बाबासाहेबांचे घर चाळीस कोटीमध्ये व मुंबई येथील इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी खरेदी करण्याच्या गोष्टी सांगतात. तर दुसरीकडे आंबेडकरी व बहुजन समाजाच्या राजकीय, सामाजिक व संघटनात्मकरित्या जुडलेल्या भवनास असामाजिक तत्वांद्वारे मध्यरात्री तोडल्यावरही आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. सन १९४४ मध्ये बाबासाहेबांनी मुंबईच्या दादर परिसरात सदर जमीन खरेदी करून आंबेडकर भवनाचे बांधकाम केले होते. याच भवनात बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची स्थापना करून मुकनायक व बहिस्कृत भारत वर्तमानपत्रे चालवित होते. एवढेच नव्हे तर आंबेडकरी-बहुजन समाजाचे उद्धार करणारे कार्य याच भवनात बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविले होते. संपूर्ण आंबेडकरी बहुजन समाजाच्या या भवनातून राजकीय, सामाजिक व संघटनात्मक नाता जुडलेला आहे. त्यामुळे भवन पाडणाऱ्यांना अविलंब अटक करण्याची मागणी सदर रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)