शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनी एकवटल्या : आष्टीच्या एसटी नियंत्रकांमार्फत आगाराला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र सदर बससेवा परवडत नसल्याच्या कारणावरून महामंडळाच्या वतीने या बसगाडीमध्ये इतरही प्रवासी बसविले जातात. परिणामी प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.आष्टी भागातील जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या नेतृत्त्वात ठाकरी, इल्लूर, कुनघाडा व चपराळा आदी गावातील विद्यार्थ्यांनी आष्टी येथील एसटीच्या नियंत्रकांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून आष्टी भागातील सदर चार ते पाच गावांमध्ये मानव विकास मिशनच्या बसगाड्या थांबवून विद्यार्थिनींना शाळेच्या गावापर्यंत पोहोचविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, आष्टी परिसरातील ठाकरी, इल्लूर, कुनघाडा, चपराळा येथील जवळपास २०० विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी येथे ये-जा करीत असतात. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने बसगाड्यांमध्ये कोंबून नेले जाते. बरेचदा बसमध्ये जागा शिल्लक नसल्याच्या कारणावरून बसचालक बसगाड्या प्रवाशी थांब्यावर थांबवित नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. महामंडळाच्या चालक व वाहकाच्या अशा प्रकारामुळे आष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा महामंडळाच्या विरोधात आंदोलन करणार, असा इशारा संजय पंदिलवार यांच्यासह विद्यार्थिनींनी दिला आहे.यापूर्वी भोगनबोडी मार्गे येणारी बस चपराळापर्यंत जात होती. ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, मार्र्कंडा (कं.) या बसथांब्यावर जलद बसगाड्या विद्यार्थ्यांसाठी थांबविण्यात याव्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक