शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल ...

गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा

आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागात नागरिकांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात रॉकेलची गरज सर्वाधिक असते. मात्र शासनाने गॅस देऊन रॉकेल बंद केल्याने गॅस सिलिंडर बीपीएलधारकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पूर्ववत रॉकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाढीव वस्त्यांमध्ये वीज खांब उभारण्याकडे दुर्लक्ष

गडचिरोली : शहरातील नवीन वस्त्यांचा विस्तार होत चालला आहे. विस्तारलेल्या वॉर्डात वीज उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मात्र मागील एक वर्षापासून नगर परिषद वीज खांब उभारण्यास विलंब करीत आहे. घरटॅक्सच्या माध्यमातून नगर परिषदेला लाखो रुपयांचा महसूल गोळा होतो. त्यामुळे वीज खांब उभारून विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

इंजेवारी मार्गाची दुरवस्था कायमच

आरमोरी : तालुक्यातील सिर्सी ते इंजेवारी या मार्गावर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने रहदारी करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाने बससेवा उपलब्ध आहे.

पुनर्वसित गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष

देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावांचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे. मात्र अरततोंडी गाव अर्धेअधिक जुन्याच ठिकाणी आहे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

मानापूर येथे बायपास मार्ग तयार करा

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर गावातून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिकांनी अतिक्रमण करून अर्धा रस्ता गिळंकृत केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता सिमेंट काँक्रीटची पक्की घरे तयार झाली आहेत. शिवाय संरक्षक भिंतीचे बांधकाम झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला. त्यामुळे दोन वाहने एकाच वेळी जाऊ करू शकत नाहीत. सदर समस्या मार्गी लावण्यासाठी मानापूर येथे बायपास मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी आहे.