शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:45 IST

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देशासनाचे लक्ष वेधले : प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.र्मोचे, संप, निषेध दिन, लक्षवेध दिन, दोन तास जादा काम आंदोलन व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सुद्धा राज्य कर्मचाºयांबाबत एकही ठोस निर्णय अद्याप होऊ शकलेले नाही, हे सध्याचे वास्तव आहे. शासनाच्या वतीने नवनवीन योजना लागू करण्यात येत आहेत. मात्र या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी नाही. त्यामुळे या योजना जनतेपर्यंत पोहचविता येत नाही. राज्यात सर्व प्रकारची १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत.नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरु करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, कामगार कायद्यात कर्मचारी विरोधी बदल करण्यात येवू नये, सर्व पदे तत्काळ भरावी, पाच दिवसांचा आठवडा करणे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा मंजूर करणे, आयकराच्या गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी, वेतन पुनर्रचनेकरिता राज्यांना अधिक निधी द्यावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्याची रक्कम थकबाकीसह लागू करणे, अधिकारी व कर्मचाºयांवर होणाºया हल्याविरोधी परिणामकारक कायदा करणे आदी प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांबाबत एकही निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाचे वेधण्यासाठी राज्यव्यापी मागणी दिन पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक अरुण तिखे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब राजपत्रित संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रफुल वडेट्टीवार, राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष वाहुळे, वनरक्षक आणि वनपाल संघटनेचे राजेश पिंपळकर तसेच महसूल कर्मचारी संघटना, कोषागार कर्मचारी संघटना, वनविभाग कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटना, पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटना, सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, महाराष्टÑ वित्त व लेखा सेवा गट-ब राजपत्रित संघटना, स्थानिक निधी लेखा परिक्षण संघटना, विक्रीकर विभाग कर्मचारी संघटना, आदीवासी कर्मचारी संघटना, कृषी विभाग कर्मचारी संघटना, समाज कल्याण कर्मचारी अशा विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.