शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

लोह प्रकल्पाने बदलणार जिल्ह्याची दशा

By admin | Updated: May 12, 2017 02:33 IST

चार राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेला आणि ८० टक्के जंगलाने व्यापलेला एकमेव जिल्हा म्हणून

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार : औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पडणार जिल्ह्याचे पहिले पाऊल लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : चार राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेला आणि ८० टक्के जंगलाने व्यापलेला एकमेव जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्र आणि नक्षलवादाने पोखरलेल्या या जिल्ह्यात आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी विकासाच्या वाटेवर या जिल्ह्याचे नाव आले नाही. मात्र आता प्रस्तावित लोह निर्मिती प्रकल्पासोबत जिल्हा मुख्यालय रेल्वेमार्गाने जोडण्याची कामे सुरू होत असल्यामुळे या जिल्ह्याची दशा आणि दिशा बदलण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. सदर लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात होणार किंवा नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि.१२) चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळच्या कोनसरी या गावात या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करणार असल्याची माहिती गुरूवारी खासदार अशोक नेते व आ.डॉ.देवराव होळी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र ओलालवार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ.भारत खटी, पं.स.उपसभापती विलास दशमुखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा.नेते यांनी सांगितले, जिल्ह्यात दळणवळणाची साधने नसल्यामुळे आतापर्यंत हा जिल्हा औद्योगिक विकासापासून वंचित राहिला. पण गडचिरोलीला रेल्वेमार्गाने जोडण्यापासून तर जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या मंजुरीपर्यंत सतत पाठपुरावा केला, दोन वेळा सभागृहात अशासकीय ठराव आणला. एवढेच नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्याची फलश्रुती होऊन आता रेल्वेमार्गासह राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्याला जोडले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विपुल प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीच्या उत्खननातून आणि त्यावर आधारित प्रकल्पांमधून जिल्ह्याची स्थिती बदलेल, अशा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला. लॉयड मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी या कंपनीच्या पुढाकाराने उभारल्या जात असलेला कोनसरी येथील प्रकल्प ५७ हेक्टर जमिनीवर राहणार असून त्यासाठी ३७ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाजारभावापेक्षा चौपट मोबदला दिला जाणार आहे. काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारीच चेक वाटपही होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लोह प्रकल्पामुळे २ हजारापेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष तर २ ते ३ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी दूर होईल. जिल्ह्यात इतरही खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात असल्यामुळे भविष्यात इतर प्रकल्प उभे होतील, असा विश्वास यावेळी खा.नेते व आ.डॉ.कोळी यांनी व्यक्त केला. म्हणून टाटांनी केला होता ‘टाटा’ जिल्ह्यातील लोहखनिजाचे उत्खनन करून प्रकल्प उभारणीसाठी १९२७ मध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जिल्ह्याच्या सुरजागड भागात जाऊन पाहणी केली होती. परंतू दळवळणाची साधने नसल्यामुळे येथे प्रकल्प उभारणे परवडणारे नसल्यामुळे टाटांनी येथे लोह प्रकल्प उभारण्याचा मानस सोडून दिला, अशी माहिती खा.नेते यांनी दिली. ‘टॅक्स हॉलिडे’ पॅकेज द्या गडचिरोली जिल्ह्यावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांची विशेष नजर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी जम्मू काश्मिर आणि उत्तरांचलच्या धरतीवर ‘टॅक्स हॉलिडे’ पॅकेज द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे यावेळी खा.नेते यांनी सांगितले. हे पॅकेज मिळाल्यास या जिल्ह्यात उद्योग उभारणी करणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे उद्योग येतील. भूमिपूजनासह मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्च महिन्यातील दौऱ्यानंतर दोन महिन्यात दुसऱ्यांदा गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर लॉयड मेटल्सच्या कोनसरी येथील लोह निर्मिती प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना होतील.