गडचिरोली : निवडणूक म्हटली हवसे-नवसे-गवसे या साऱ्यांचीच चलती राहते. उमेदवारांच्या मागेपुढे राहून ते भूमिका पार पाडत राहतात. मात्र या साऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीत काही स्टार प्रचारक आपले नाव इतिहासाच्या पाटीवर कोरून जातात. त्यांच्या वर्षानूवर्षाच्या कार्यप्रणालीमुळे ते नेहमीच लोक माणसामध्ये मानाचे स्थान मिळवून राहत असतात. काहींच्या अंगात हा गुण पिढीजात राजकारणातून येत असतो. गडचिरोली जिल्ह्याच्याही राजकारणात असे अनेक लोक आहेत जे कायम प्रचारात राहून चर्चीत चेहरे राहिलेले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात हे पाच चेहरे समोर ठेवले असले तरी पडद्यामागे काम करणाऱ्यांची यादी बरीच लांब आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हरीश मने, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले रवीन्द्र वासेकर, प्रकाश ताकसांडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीन्द्र दरेकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवीन्द्र ओल्लालवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद पिपरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी आदी अनेकांचा यात समावेश आहे.
पडद्यामागील व पडद्यासमोरचे स्टार प्रचारक
By admin | Updated: October 11, 2014 01:40 IST