शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस उंचावणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला. सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कबामणी : आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिकांना परंपरागत धान लागवडीसोबत फळबाग लागवडीचा नवीन मार्ग दाखवत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. पोलिसांच्या दादालोरा खिडकीच्या कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पपईसह इतर फळझाडांची १५ हजार रोपे पोलिसांनी वाटप केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.शेतकऱ्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बामणी पोलीस स्टेशनच्या परिसरात १५ हजार पपई रोपांची रोपवाटिका तयार करण्यात आली. दि.२२ ला बामणी येथे पपई लागवड प्रशिक्षण व रोपे वाटप मेळावा पार पाडण्यात आला.सुरुवातीला पोलीस अधीक्षक गोयल यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक मदन मस्के (प्रभारी अधिकारी, बामणी) यांनी लिहिलेल्या पपई लागवड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी समजून घेऊन कृषी विभागाच्या विविध योजना व कृषी तंत्रज्ञान तसेच पपई लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सिरोंचा मदन मेश्राम पं.स. सिरोंचाचे कृषी अधिकारी एस.डी.  कोपनार  यांनी  मार्गदर्शन  केले.यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० पपई रोपे, गांडूळ खत व पपई लागवडीबाबतच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. १० महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस किटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा राहुल गायकवाड, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, प्रगतिशील शेतकरी रवी कारसपल्ली, उपपोस्टे ब्रामणीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच अहेरी, जिमलगट्टा उपविभागातील २०० ते २५० शेतकरी उपस्थित होते. पाेलिसांच्या या उपक्रमाचे त्यांनी काैतूक केले.कार्यक्रमासाठी उपपोस्टे बामणीचे प्रभारी अधिकारी सपोनि मदन मस्के, पो.उपनिरीक्षक दीपक पारधे, संभाजी मुंडे, उदय पाटील व अंमलदार आदींनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी  विविध ठाण्यांचा पुढाकार- शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता आर्थिक उत्पन्नवाढीचा स्रोत बनावी यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पीक पद्धतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच रोपे वाटप करून कृषीविषयक जागृती आणण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वी कृषी समृद्धी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पेरमिली पो.स्टे.मार्फत जिल्हाभरातील होतकरू व गरजू शेतकऱ्यांना १५ हजार शेवगा रोपे वाटप करण्यात आली होती. राजाराम (खां.) पोलिसांच्या वतीने १५ हजार सीताफळ रोपांची रोप वाटिका तयार केली असून ती रोपेही शेतकऱ्यांना लागवडीकरिता वाटप केली जाणार आहेत, असे यावेळी पो. अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.

 

टॅग्स :Policeपोलिसagricultureशेती