शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी करणार आता माल वाहतूक; स्क्रॅप झालेल्या वाहनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:00 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्क्रॅप झालेल्या एसटी बसगाड्या वापरल्या जाणार आहेत.प्रवाशी वाहतुकीसाठी जास्तीत जास्त १० वर्ष किंवा ६ लाख ५० हजार किमी चालेपर्यंत वाहन वापरता येते. त्यानंतर सदर वाहन स्क्रॅप (वापरातून दूर) केले जाते. एसटी महामंडळाकडे आयुर्मान संपलेल्या जवळपास ३ हजार बसगाड्या आहेत. सदर बसगाड्या प्रवाशी वाहतुकीसाठी वापरता येत नसल्या तरी त्या माल वाहतुकीसाठी वापरता येणे शक्य आहे. तसेच महामंडळाकडे एकूण २७८ ट्रक आहेत. या ट्रकचाही वापर माल वाहतुकीसाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे खासगी व्यक्तींनाही माल वाहतुकीसाठी एसटीची वाहने भाड्याने उपलब्ध होणार आहेत. या वाहनामध्ये जास्तीत जास्त ८ ते ९ मेट्रीक टन माल वाहतूक होणार आहे.एसटीच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात स्क्रॅप झालेल्या बसेस आहेत. त्या बसेसचे मालवाहू वाहनामध्ये रूपांतर करून शक्य तेवढ्या लवकर माल वाहतूक सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत. गडचिरोली विभागात स्क्रॅप झालेल्या २३ बसगाड्या आहेत. या बसगाड्यांना मालवाहू वाहनांमध्ये रूपांतरीत केल्या जाणार आहेत. वाहतुकीसाठी माल उपलब्ध होईल या दृष्टीने गडचिरोली विभागाने नियोजनसुद्धा सुरू केले आहे.प्रवाशांना आकर्षित करून उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. यातील काही प्रयोग यशस्वीसुद्धा झाले आहेत. तरीही सद्यस्थितीत एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. माल वाहतूक करतानाही एसटीला खासगी ट्रक व्यावसायिक यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. या स्पर्धेत टिकण्याचे कौशल्य कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये निर्माण करावे लागणार आहे.

सीट काढून बसविणार मागे दरवाजाबसचे मालवाहू वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी बसमधील संपूर्ण आसने काढली जाणार आहेत. प्रवाशी प्रवेश करण्यासाठी असलेला समोरचा दरवाजा बंद केला जाणार आहे. मागच्या बाजूने मोठे दार बसविले जाणार आहे. चारही बाजूने टिनाचे पत्रे राहत असल्याने पावसापासून मालाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी