शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

एसटीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: January 4, 2015 23:10 IST

सुरक्षेची हमी देणारा प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून गडचिरोली आगाराच्या अनेक बसगाड्या शैक्षणिक सहलीकरीता

बसगाड्या व वाहक कमी असल्याचा परिणाम : तास-दीड तास उशिरा पोहोचत आहेत बसगाड्यागडचिरोली : सुरक्षेची हमी देणारा प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र गेल्या सहा-सात दिवसांपासून गडचिरोली आगाराच्या अनेक बसगाड्या शैक्षणिक सहलीकरीता बुकींग होत आहेत. तसेच वाहकाच्या कमतरतेमुळे एक ते दीड तास बसगाड्या उशीरा पोहोचत आहे. एसटीचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.महामंडळाच्या गडचिरोली आगाराकडे एकूण १०७ बसगाड्या आहेत. या आगाराचे दैनंदिन १०६ शेड्युल आहेत. सद्य:स्थितीत गडचिरोली आगाराच्या बस वाहतूक व्यवस्थेकरीता २३० चालक व २०७ वाहक आहेत. यापैकी चार ते पाच वाहक निलंबित करण्यात आल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर नाहीत. तर चार ते पाच चालक व वाहक दिर्घ आजाराच्या रजेवर आहेत. याशिवाय दररोज २० ते २२ चालक वाहक साप्ताहिक विश्रांती असतात. गडचिरोली आगाराकडे दैनंदिन शेड्यूलच्या अनुषंगाने चालकाची संख्या पुरेशी आहे. तर ३० ते ३५ वाहकांची रोजच कमतरता भासते. हिवाळा असल्याने शैक्षणिक सहलीचा उपक्रम जोमात सुरू आहे. याकरीता गडचिरोली आगाराच्या अनेक बसेस अधिग्रहीत केल्या जातात. २० डिसेंबरला ४, २१ डिसेंबरला ४, २२ डिसेंबरला ४, २३ डिसेंबरला ५, २४ डिसेंबरला ८, २५ डिसेंबरला ३, २६ डिसेंबरला ५, २७ डिसेंबरला २, २८ डिसेंबरला ३, ३० डिसेंबरला ४, २ जानेवारीला ३ व ३ जानेवारीला ३ बसेस बुकींग करण्यात आल्या होत्या. तर उद्या ५ जानेवारीला ३ बसेस शैक्षणिक सहलीसाठी बुकींग करण्यात आल्या आहेत. भौगोलिक वाहतुकीचे क्षेत्र अधिक असून दैनंदिन शेड्युल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या तुलनेत गडचिरोली आगाराकडे बसगाड्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे आगार व्यवस्थापकाला काही दैनंदिन शेड्यूल रद्द करावे लागतात. चालकांच्या कमतरतेमुळे बसगाड्या वेळेवर सोडण्यासाठी तसेच पोहोचण्यासाठी उशीर होतो. मानव विकास मिशनच्या गडचिरोली आगाराकडे एकूण ३५ बसगाड्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून या बसगाड्यांची वेगमर्यादा बांधून देण्यात आली आहे. सध्या या बसगाड्या ४५ ते ५० या वेग मर्यादेत धावत आहेत. त्यामुळे सदर बसेस पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)