शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

एसटीला ११ कोटी १६ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: October 5, 2016 02:10 IST

शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे.

शाळकरी मुलींसाठी अहिल्याबाई होळकर प्रवास योजनागडचिरोली : शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल, जुलै, आॅगस्ट २०१६ या तीन महिन्याच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाला एकूण ११ कोटी १६ लाख ८ हजार ४०२ रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यातून गडचिरोलीचा एसटी विभाग मालामाल झाला आहे.राहत्या गावापासून पाच किमी अंतरापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या शाळेच्या गावी ये-जा करून विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत अहिल्याबाई होळकर मोफत बससेवेची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन इयत्ता पाच ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनी बाहेरगावातील शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सदर योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविले जात आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य परिवहन महामंडळाचे सहकार्य घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अहेरी व गडचिरोली आगारामार्फत विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण ३ हजार ७५ विद्यार्थिनींनी एसटीचा मोफत प्रवास केला. या प्रवासापोटी राज्य शासनाकडून गडचिरोलीच्या एसटी विभागाला २० लाख ६३ हजार ७२० रूपयाचे उत्पन्न मिळाले. सन २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील जुलै महिन्यात ६ हजार ८२५ विद्यार्थिनींनी स्वगावापासून शाळेच्या गावापर्यंत मोफत प्रवास केला. यातून गडचिरोली एसटी विभागाला ४४ लाख ९२ हजार २९ रूपयाचे उत्पन्न मिळाले. आॅगस्ट महिन्यात ६ हजार ९३६ लाभार्थी विद्यार्थिनींच्या प्रवासातून ४६ लाख १२ हजार ६५३ रूपयांचे उत्पन्न प्रतिपुर्ती मुल्यातून गडचिरोली एसटी विभागाला मिळाले. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली एसटी विभागाला निळ्या रंगाच्या स्वतंत्र बसेस देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींसाठीच्या सदर बसफेऱ्या शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागात पोहोचत आहेत. शासनाच्या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यवधी रूपयाचा नफा मिळत आहे. याशिवाय खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयाच्या सहलीतूनही गडचिरोली आगाराला लाखो रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)शासनाकडे अनुदान प्रलंबित; महामंडळ अडचणीतराज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत शालेय विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस सुविधा पुरविली जाते. या सेवेपोटी शासनाला राज्य परिवहन महामंडळाकडे विद्यार्थिनींचे प्रतिपुर्ती मुल्य हे प्रवास खर्च म्हणून अदा करावे लागतात. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे शासनातर्फे सदर प्रवासाचे प्रतिपूर्ती मुल्य अदा केले जाते. मात्र शासनाकडे परिवहन महामंडळाचे लाखो रूपयाचे प्रतिपुर्ती मुल्य शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.