लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/गुड्डीगुडम : चालकाला चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात २१ प्रवासी आणि चालक-वाहक असे एकूण २३ जण जखमी झाले. सदर अपघात आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम गावातील आश्रमशाळेजवळ सोमवारी दुपारी २.३० वाजता घडला.अहेरी आगाराची बस जवळपास ५० प्रवाशांना घेऊन सिरोंचाकडे जात होती. दरम्यान बस चालक पी.आर. सिडाम यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात वाहनचालक सिडाम यांना गंभीर मार लागला आहे. तसेच वाहक यु.के. सिडाम हे सुध्दा जखमी झाले.जखमींना अहेरी रूग्णालयात तत्काळ भरती करण्यात आले. जखमी प्रवाशांमध्ये राजूबाई सातपुते (६५), प्रमोद सिडाम (४५), संतोष आत्राम (२५), शंकर दुर्गम (३५), शशीकला जनगम (५०), विक्रांत वनकर (७), गणेश येरमा (१७), शारदा मोहुर्ले (४५), सोमेश्वर मोहुर्ले (५५), प्रभाकर येनगंटीवार (७२), मोरेश्वर मोहुर्ले (५३), समाय्या मडावी (३५), मलेश रामगिरवार (२५), मारू आत्राम (३५), दिवाकर मांदा (२१), बापू थायरकर (७०), विजया पोटा (५०), वैशाली दुर्गे (२१), सुलोचना पागे (२५), पापय्या जिद्दरवार (३५), सपना रालाबंडी (२८) यांचा समावेश आहे. यातील १२ प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी तत्काळ एक हजार रुपयांची मदत देण्यात आली.तिकीटावरील विम्यामुळे मिळणार मदतअपघातानंतर प्रवाशाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी एसटीने विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तिकीटामागे एक रुपया अतिरिक्त जोडला जातो. अपघात झाल्यानंतर प्रवाशाला आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत दिली जाते. प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, अंशत: दुखापत झाल्यास २.५० लाख रुपये, दुरूस्ती होणारी दुखापत झाल्यास एक लाख रुपये दिले जातात. तसेच प्रवाशाच्या उपचाराचा खर्च एसटी उचलते, असा एसटीचा नियम आहे. या नियमानुसार अपघातातील जखमी प्रवाशांना मदत द्यावी, अशी मागणी आहे.
एसटी बसची झाडाला धडक, २१ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST
अहेरी आगाराची बस जवळपास ५० प्रवाशांना घेऊन सिरोंचाकडे जात होती. दरम्यान बस चालक पी.आर. सिडाम यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात वाहनचालक सिडाम यांना गंभीर मार लागला आहे. तसेच वाहक यु.के. सिडाम हे सुध्दा जखमी झाले.
एसटी बसची झाडाला धडक, २१ जखमी
ठळक मुद्देगुड्डीगुडमजवळ अपघात : चालकाला चक्कर आल्याने घात