शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

एसओएसचा श्रीरंग देशमुख अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 00:36 IST

सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.

चारही शाळांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण : सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी परीक्षेचा निकाल लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स (एसओएस) चा विद्यार्थी श्रीरंग देशमुख याने ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या एकूण चार शाळा आहेत. यामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर्स, देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील कारमेल अ‍ॅकॅडमी व घोट येथील नवोदय विद्यालय यांचा समावेश आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्समधून दहाव्या वर्गासाठी एकूण १०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १०० ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्रीरंग देशमुख याने ९८.४० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर प्रथमेश इंगळे याला ९८ टक्के गुण मिळाले असून तो द्वितीय तर हर्षीत जैन याने ९७.६ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. २१ विद्यार्थ्यांना १० सीजीपीए मिळाले आहे. श्रीरंग देशमुख, रोहित गोटमारे, हर्षीत जैन यांनी गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. श्रध्दा कुमरे, रोहित गोटमारे व श्रीरंग देशमुख यांनी मराठी विषयात सुध्दा १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. ३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. १० सीजीपीए मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या विरूलकर, प्रथमेश इंगळे, श्रीरंग देशमुख, हर्षीत जैन, आचल सहारे, आस्था झाडे, शर्वरी बोरकर, अपूर्वा पगडपल्लीवार, मृणाल महेशकर, राघव हेमके, रोहित गोटमारे, सौमित्र रोहणकर, जानवी साळवे, रावी बट्टुवार, श्रध्दा कुमरे, श्रेया चिचघरे, श्रेया रजवाडे, तन्वी बुधबावरे, क्रोध बारसागडे, मानस दरेकर, निनाद सिडाम यांचा समावेश आहे. निकाल घोषीत झाल्यानंतर प्राचार्य उषा रामलिंगम, उपप्राचार्य निखील तुकदेव यांनी श्रीरंग देशमुख याच्यासह इतर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षक उपस्थित होते. घोट येथील नवोदय विद्यालयातून ७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सर्वच विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. अवंतिका योगीराज कवाडे, शिवानी यादव पेंदाम या दोन विद्यार्थिनींना १० सीजीपीए मिळाला आहे. मनिष बुरांडे, सुरेश कऱ्हाडे या दोघांचा सीजीपीए ९.८, अमेय ओल्लालवार, दिशा लेणगुरे, वैष्णवी गजपुरे, गोपालक्रिष्ण दुधबळे, मानसी साखरे या विद्यार्थिनींना ९.६ एवढा सीजीपीए मिळाला आहे. या सर्व विद्यार्थिनींना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहेत. देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील कारमेल अ‍ॅकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे. नाशरानाज अब्दुल सत्तार शेख व जयकुमार अनिल चांडक या दोघांना ९८ टक्के गुण मिळाले असून ते दोघेही शाळेतून प्रथम आले आहेत. तेजस दिलीप हेडाऊ याला ९७ टक्के गुण मिळाले आहे. तो द्वितीय आला आहे. अंकूश ज्ञानेश्वर बुरांडे व मृणल रमेश हरणे यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. कारमेल अ‍ॅकॅडमीची दहाव्या वर्गाची पहिलीच बॅच होती. मुख्याध्यापक फादर सी. सी. जार्ज, अगस्टीन अ‍ॅलेचेरी, सिस्टर मॉरीस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.