शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चव्हेलावासीयांच्या पुनर्वसनाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:30 IST

कोसरी लघुसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चव्हेला गावाचे कोसरी-मांगदा मार्गावर पाच एकर शेतीत पुनर्वसन केले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून दिले जात आहे.

ठळक मुद्देघरांचे बांधकाम सुरू : ७७५ हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

डी. के. मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : कोसरी लघुसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चव्हेला गावाचे कोसरी-मांगदा मार्गावर पाच एकर शेतीत पुनर्वसन केले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून दिले जात आहे. त्याचबरोबर गावाच्या परिसरात शाळा, अंगणवाडी, रस्ते, पाणी, विजेची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.१९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून एकही सिंचन प्रकल्प होऊ शकला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री डॉ. सुनील देशमुख व आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे तत्कालीन आमदार आनंदराव गेडाम यांच्या पाठपुराव्यामुळे आरमोरी तालुक्यातील कोसरी व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा या दोन लघुसिंचन प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली होती. कोसरी लघुसिंचन प्रकल्पाच्या कामाला २०११ मध्ये सुरू झाली. २०१५ मध्ये ९५ टक्के काम पूर्ण झाले. मात्र या सिंचन प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या चव्हेलावासीयांनी आमचे पुनर्वसन केल्याशिवाय गाव न सोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे पुढील कामे ठप्प पडली. बांधावर पाणी सोडण्याचे गेट बसविण्यात आले आहे. मात्र कालव्याची कामे प्रलंबित पडली आहेत.चव्हेलावासीयांनी जमीन व घराच्या मोबदल्याकरिता न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाने चव्हेलावासीयांच्या बाजुने निर्णय देत त्यांच्या शेत जमिनीला योग्य किंमत व घर बांधून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शासनाने मांगदा मार्गावर पाच एकर शेती खरेदी केली आहे. या ठिकाणी १२३ घरे बांधण्यासाठी ले-आऊट टाकण्यात आले आहेत. शाळा, अंगणवाडी व इतर सार्वजनिक सुविधांचेही बांधकाम सुरू आहे. रस्ते, पाणी, वीज सुविधा सुध्दा उपलब्ध करून दिली जात आहे. एखाद्या शहराप्रमाणे कॉलनी उभी राहत आहे. चव्हेलावासीय घराचे बांधकाम करण्यात गुंतले आहेत. कोसरी सिंचन प्रकल्पामुळे ७७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.