शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

बस स्थानकाच्या कामास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

तेलंगणा, महाराष्ट्रराज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरीलपुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते.

ठळक मुद्देपाच कोटी रूपयांतून सुरू आहे बांधकाम : प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : शासनाच्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून सिरोंचा येथे बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असून या कामाने आता वेग घेतला आहे. खोदकाम आटोपले असून कॉलम उभारण्यात आले आहे. खासगी कंत्राटारामार्फत हे काम मजुरांकरवी सुरू आहे.सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्रराज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरीलपुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते. सिरोंचा येथे सर्व सोईसुविधा युक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे, अशी मागणी येथील जनतेने अनेक वर्षांपासून केली होती.सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने सिरोंचा येथे सिरोंचा येथील बसस्थानकासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.सिरोंचा शहर हे महत्त्वाचे शहर असून गडचिरोली जिल्हा होण्यापूर्वी या शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला होता. सिरोंचा येथे सोमनूर संगम, कालेश्वर व इतर पर्यटनस्थळे असल्याने पर्यटकांची तालुक्यात वर्दळ असते. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने दूरवरून आलेल्या प्रवाशांची परवड होत असते. आता नव्या स्वरूपाचे बसस्थानक होणार असून या कामाकडे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेचे संपूर्ण लक्ष आहे. पावसाळ्यापूर्वी सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी सिरोंचा शहरासह अहेरी उपविभागातील प्रवाशांनी केली आहे.नव्या बसगाड्या उपलब्ध करण्याची मागणीराज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारामार्फत सिरोंचा तालुक्यासह संपूर्ण अहेरी उपविभागात शेकडो बसगाड्या दररोज चालविल्या जातात. मात्र उपविभागाच्या दुर्गम भागात जाणाºया बसगाड्या या पूर्णत: भंगार झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागासाठी शासनाने नव्या बसगाड्या उपलब्ध कराव्या, अशी मागणी आहे.