शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत पाण्यासाठी मारामार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:58 IST

शहरातील काळागोटा हनुमान नगर परिसरातील एकमेव हातपंप बंद असून या भागात नगर पंचायतीच्या नळ योजनेचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात ऐन हिवाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहनुमान नगरातील समस्या : नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शहरातील काळागोटा हनुमान नगर परिसरातील एकमेव हातपंप बंद असून या भागात नगर पंचायतीच्या नळ योजनेचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात ऐन हिवाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.शहरातील काळागोटा हनुमान नगरात मोठ्या संख्येने लोकवस्ती असताना नगर पंचायत प्रशासनाने येथे एकच हातपंप दिला आहे. या एकमेव हातपंपावर महिलांची प्रचंड गर्दी होत असते. वारंवार पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी नगर पंचायतीने सदर हातपंपावर सौरऊर्जेवरील नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी उपसरपंच रघुनाथ मोंगरकर, मिलींद खोब्रागडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे.आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराला १९ लाख लीटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्ष निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सात लाख लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने अनेक भागातील नागरिक त्रस्त आहेत. नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गाढवी व वैनगंगा या नद्यांवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या दोन्ही योजनेअंतर्गत सात लाख लीटर पाणीपुरवठा दररोज होतो. शासन नियमानुसार शहरी भागात राहणाºया प्रत्येक व्यक्तीला दिवसातून ७० लीटर पाण्याची गरज असते. नळ योजनेअंतर्गत नदीपात्रातून इंटक वेलमध्ये पाणी ओढण्यासाठी कमी वीज दाबाची मशिन बसविण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरी शहराला पाणीपुरवठा होण्यास बराच विलंब होतो. योग्य उपाययोजना करून शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणी