शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

एक टक्का क्षेत्रावरच पेरणी

By admin | Updated: July 1, 2014 23:28 IST

जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत.

शेतकरी संकटात : पेरलेले बियाणेही धोक्यातगडचिरोली : जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामात १ लाख ६६ हजार ८० हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. यासाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसे बियाणे व खते उपलब्ध करून दिले. मात्र पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. पावसाने कायमची दडी मारल्याने बियाण्यांची पेरणी करण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. जिल्ह्यात एकूण १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी ५४ हजार ४६० हेक्टरवर आवत्या व ९४ हजार ८०० हेक्टरवर धानाची रोवणी करण्यात येणार आहे. रोवणीसाठी पऱ्हे आवश्यक आहेत. केवळ २ हजार ६८७ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहेत. तर १ हजार ४०४ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. ६ हजार ३२० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १ हजार २८० हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तुरीच्या ४ हजार २६० हेक्टरपैकी ४५५, तिळाच्या ७०० हेक्टरपैकी ८ हेक्टरवर बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीला उशीर झाल्यानंतर उत्पादनात घट होते. हा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमीच होईल. या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. कर्जाचे डोंगर कसे फेडावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)