शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे सार्वभौमत्व प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:52 IST

भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे.

ठळक मुद्देभुपेंद्र रायपुरे यांचे प्रतिपादन : तळोधी येथे कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत तळोधी मो. : भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता कायद्याचे पालन करण्याची कसब नमूद आहे. जगात सार्वभौमत्व प्रदान करणारा एकमेव संविधान असल्याचे प्रतिपादन प्रमुख अधिवक्ता अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे यांनी केले.तळोधी केंद्रांतर्गत ग्रामपंचायत आवारातील सभागृहात संविधान दिन समारोहाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाम रामटेके, गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे, धर्मानंद मेश्राम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी सुरजागडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गौतम मेश्राम, ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले, पर्यवेक्षिका वाळके, मुख्याध्यापक बोमनवार, मारोती दुधबावरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक रमेश बारसागडे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना केलेल्या चिंतनावर भर टाकला. शाम रामटेके यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. धर्मानंद मेश्राम यांनी संविधान संहितेच्या वापराबाबतची माहिती दिली. दीपक देवतळे यांनी संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मारोती दुधबावरे, संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार मुख्याध्यापक बोमनवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या कर्मचाºयांनी, शिक्षकांनी सहकार्य केले.