शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा विटंबना करणाऱ्याला क्षमादान

By admin | Updated: August 13, 2015 00:29 IST

येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या इसमास गुरूदेव भक्तांनी मोकळ्या मनाने क्षमा केली.

रांगी : येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या इसमास गुरूदेव भक्तांनी मोकळ्या मनाने क्षमा केली. तसेच सदर इसमास दररोज राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचनाची व व्यसनाचा त्याग करण्याची अनोखी शिक्षा सुनावली. दरम्यान, गुरूदेवभक्तांनी सदर इसमांकडून प्रतिज्ञा वदवून घेतली.रांगी येथील ग्राम पंचातयीच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अज्ञात इसमाने या पुतळ्याची तोडफोड केली होती. दुसऱ्या दिवशी ही घटना निदर्शनास आल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयम बाळगला होता. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुरूदेव भक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांनी संशयीत आरोपीची चौकशी केली. दरम्यान मंगळवारी रांगी येथील ग्रा. पं. कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली. या सभेला अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंजा आश्रम मोझरीचे उपसर्वाधिकारी रूपराव वाघ, राजकुमार जयस्वाल, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रा. भाऊराव पत्रे, दलित मित्र नानाजी वाढई, गुरूदेव सेवामंडळाचे सचिव पंडीत पुडके, सुधीर धकाते, सरपंच जगदीश कन्नाके, माजी पं. स. सदस्य शशिकांत साळवे, प्रकाश महाराज काटेंगे, तंमुस अध्यक्ष श्यामराव बोरसरे, विश्वनाथ चापडे, हरी वालदे, शालीक भोयर, महेंद्र बैस, के. जी. नेवारे, नामदेव गेडाम आदी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या पुतळ्याची तोडफोड करणारा संशयीत आरोपी दादाजी संभाजी टिंगुसले रा. रांगी याला हजर करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबुल केला. गुरूदेव सेवामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे दादाजी टिंगुसले याने क्षमायाचना केली. यावेळी त्याला ग्रामगीता भेट देऊन दररोज ग्रामगीतेचे वाचन करण्यास सांगण्यात आले. सर्व व्यसने सोडून देण्याची प्रतिज्ञा त्याच्याकडून वदवून घेण्यात आली. गुरूदेव सेवामंडळाच्या पदाधिकारी व गुरूदेव भक्तांनी त्याला उदार अंत:करणाने क्षमा केल्यामुळे जनमानसावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. थोर पुरूष अथवा देवी, देवतांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी संतप्त नागरिक तावडीत सापडलेल्या आरोपीला मारहाण करतात. मात्र असे काही न करता गुरूदेव भक्तांनी या प्रकरणातील आरोपीला माफ केले.