शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

नक्षल कुटुंबांनी मांडल्या पोलिसांसमोर व्यथा

By admin | Updated: December 4, 2015 01:38 IST

नवजीवन योजनेंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नक्षल कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता,...

नवजीवन मोहीम : पोलीस अधिकाऱ्यांची नक्षल कुटुंबांना भेट; योजनेची दिली माहितीगडचिरोली : नवजीवन योजनेंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नक्षल कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, नक्षल कुटुंबांनी स्वत:च्या व्यथा पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नक्षल्यांना आत्मसमर्पण योजनेचा लाभ देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाने नवजीवन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी नक्षल कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून देत आहेत. अहेरी एलओएस दलम कमांडर अशोक मंगा पेंदाम याच्या लिंगमपल्ली येथील कुटुंबाला रेपनपल्लीचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी त्याची पत्नी आत्मसमर्पीत दुर्गूबाई अशोक पेंदाम त्यांची दोन लहान मुले, आई व भाऊ हजर होते. चातगाव दलम सदस्य शरद उर्फ गोविंदा शामजी आतला याच्या पुस्टोला येथील घराला पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्याचे आई-वडिल व भाऊ हजर होते. आईने त्याची व्यथा मांडली व त्याच्या जीवनाबद्दल काळजी व्यक्त केली. पोलीस अधिकाऱ्यांनी तिला आत्मसमर्पण योजना समाजावून सांगितली. अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या कोळसेपल्ली येथील नक्षल सदस्य जन्नी डोलू तलांडी हिच्या घरी पोलीस अधिकारी लवटे यांनी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. लवटे यांनी वेलगुर येथील नक्षल सदस्य पापक्क्या बुचय्या चौधरी याच्याच्याही कुटुंबाची भेट घेतली. नक्षल कुटुंबांना भेटीदरम्यान मिठाईचे वितरण करण्यात आले. पोलीस विभागाच्या वतीने नवजीवन मोहीम मागील १५ दिवसांपासून राबविली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येईल, अशी आशा पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)