शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

दिवाळी संपताच काेेराेेना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू : ८० नवीन बाधित

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीपासून नवीन काेराेना बाधितांची संख्या कमी हाेत हाेती तर काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत हाेती. मात्र दिवाळी संपताच आता गणित उलटे झाले असून काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. तर काेराेनामुक्त हाेण्याचे प्रमाण कमी आहे. ही स्थिती कायम राहिल्यास काेराेनाचे संकट पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी ५१ काेराेनामुक्त झाले तर ८० नवीन बाधित आढळून आले. गडचिराेलीतील सर्वाेदय वाॅर्डातील एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७ हजार १२९ झाली आहे. ६ हजार ५६१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ४९४ जणांवर उपचार सुरू आहेत. काेराेनामुळे एकूण ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९२.०३ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ६.९३ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील स्थानिक ५, स्नेहानगर शिवमंदिर जवळ १, गोकुलनगर ५, अयोध्यानगर २, बालाजीनगर १, कॅम्प एरिया १, स्नेहवाॅर्ड १, रेड्डी गोडाऊन जवळ २, रामनगर ३, बसेरा कॉलनी १, साईनगर २, लक्ष्मीनगर १, रामपुरी वाॅर्ड १, सोनापूर कॉम्पलेक्स १, सर्वोदय वाॅर्ड २, पोर्ला १, माथुरानगर १, आयटीआय चौक १, अहेरी तालुक्यातील स्थानिक १४, आलापल्ली २, महागाव १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक ७, बस स्टॉप जवळ १, भामरागड तालुक्यातील हिंडेवाडा १, येला १,  चामोर्शी तालुक्यातील टिचर कॉलनी १, हनुमान नगर १, स्थानिक १, आष्टी १, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील गरपल्ली १, स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, मुलचेरा तालुक्यातील मोहुर्ली १, स्थानिक १, देेसाईगंज तालुक्यातील स्थानिक १, माता वाॅर्ड ३, कस्तुरबा वाॅर्ड १, अरुणनगर १, कोरेगाव १, हनुमान वाॅर्ड २ बाधितांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.

आराेग्य विभागाचा अंदाज खरा ठरलादिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच काही जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र दवाखान्यात राहिल्यास दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी चाचणी केली नाही. ते नातेवाईक, बाजारपेठ व घरी खुलेआम फिरत हाेते. अशा रुग्णांनी अनेकांना संसर्ग केला आहे. दिवाळी संपताच आता संसर्गबाधित जुने व नवे रुग्ण आता दवाखान्यात दाखल हाेत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ती आणखी वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. भाऊबिजेसाठी काही नागरिक दुसऱ्या गावी गेले आहेत. प्रवासादरम्यान त्यांना संसर्ग हाेण्याची भीती आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या