शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोनापुरात खोडकिडीने धानपीक केले फस्त

By admin | Updated: November 19, 2014 22:38 IST

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या सोनापूर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर खोडकिडा, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

चामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या सोनापूर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर खोडकिडा, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. हातात आलेले धानपिकावर रोगाने हल्ला चढविल्यामुळे या गावातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे. शासनाने सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. सोनापूर येथील शेतकरी श्रावण दुधबावरे यांच्या सर्व्हे नं. ११० मधील ०.६२ हेक्टर आर, सर्व्हे नं. १११ मधील ०.४७ व सर्व्हे नं. ११५ मधील ०.३८ हेक्टर आर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात संकरित धानपिकाची लागवड केली. या धानपिकावर तिनदा रोगांचे आक्रमण झाले. त्यामुळे शेतकरी श्रावण दुधबावरे यांनी तिनवेळा कीटकनाशक औषधांची धानपिकावर फवारणी केली. मात्र या कीटकनाशक औषधांचा १०० टक्के उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतातील धानपीक हातात येण्याच्या उंबठ्यावर पुन्हा खोडकिड, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे धान उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी श्रावण दुधबावरे याने लोकमत प्रतिनिधीकडे व्यक्त केला.रोगामुळे धानपिकाच्या लोंबावर मोठा परिणाम होतो. रोगामुळे धान कापणीच्या पूर्वीच धानाचे लोंब गळून पडतात. त्यामुळे धान्य सडते. रोगामुळे धान्य वजनाने हलके होतात. परिणामी अशा धानाला योग्य भाव मिळत नाही, असेही शेतकरी दुधबावरे यांनी यावेळी सांगितले. सोनापूर गावातील धानपिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती येथील सरपंच गयाबाई सिडाम यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व तलाठ्यांना कथन केली. तसेच तत्काळ या धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)