शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

राशन दुकानदारांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: February 12, 2015 01:09 IST

अखिल भारतीय राशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या आवाहनानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक तालुका संघटना ...

अहेरी : अखिल भारतीय राशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या आवाहनानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवानाधारक तालुका संघटना अहेरीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात अहेरीचे तहसीलदार के. वाय. कुनारपवार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व तहसीलदार कुनारपवार यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. दिलेल्या निवेदनात रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, केरोसीन नियतन वाढविण्यात यावा, रेशन दुकानाचे भाडे व दोन नोकरांचा पगार व वीज बिलाची रक्कम शासनाने द्यावी, रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याचा खर्च देण्यात यावा, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण रेशन व केरोसीन दुकानातून व्हावे, एपीएलधारकांच्या धान्याचे बंद केलेले वितरण पुन्हा सुरू करण्यात यावे, रेशनधान्याचे कमिशन प्रती क्विंटल १०० रूपये करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सरकारी स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक तालुका संघटनेचे अध्यक्ष मारय्या बेझनवार, उपाध्यक्ष जगदीश सौरंगपते, पी. यू. सुंधरी, गंगाराम दुर्गम, बाबुराव मुक्कावार, एल. के. परकिवार, बी. पी. सिडाम, जे. बी. सिडाम, एस. ई. करपेत, बी. बी. मडावी, जे. व्ही. सडमेक, जे. एल. आत्राम, बी. बी. कुमरे, पी. एच. बंडावार, भगवान मडावी, वैभव कोटगीरवार, आर. के. भट आदी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक विक्रेते उपस्थित होते. तहसीलदार कुनारपवार यांनी मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करून दुकानदारांच्या भावना शासनस्तरावर मांडणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)