जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : विदर्भ पटवारी संघ गडचिरोली शाखेच्या वतीने निवेदनगडचिरोली : सेवा पुस्तिका अद्ययावत करणे, सेवा पुस्तिकेची पडताळणी करणे यासह कारभारातील विविध समस्या त्वरित मार्गी लावाव्या, अशी मागणी विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे याच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात, सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करणे, तलाठ्यांचे पगार नियत दिनांकास काढणे, तलाठ्यांना प्रशिक्षण देणे, नवीन लॅपटॉप पुरविणे, प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सभा घेणे, कोतवालांच्या रिक्त जागा भरणे, तलाठी कार्यालयाच्या भाड्याची रक्कम त्वरित उपलब्ध करणे, वनहक्क सातबारा पुरविताना निर्माण होणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे, संगणक प्रशिक्षण देणे, ई-फेरफार, वेतन प्रमाणपत्रातील अडचणी सोडविणे, कृषी गणना, ग्राम पंचायत मतदार यादीचा मेहनताना देणे, तलाठ्यांना कालबद्ध पदोन्नती देणे, अतिरिक्त कार्यभाराचा मेहनताना देणे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देताना गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष के. पी. ठाकरे, सचिव एकनाथ चांदेकर, उपाध्यक्ष पी. टी. तुलावी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यातील तलाठ्यांच्या समस्या मार्गी लावा
By admin | Updated: September 14, 2015 01:22 IST