शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

स्वजल योजनेतून सौर ऊर्जेने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:04 IST

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देआकांक्षित गडचिरोलीसाठी केंद्राचा उपक्रम : १० टक्के लोकसहभागातून मागेल त्या गावाला मिळणार लाभ

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी अस्तित्वात असलेल्या बोअरवेलवर (हातपंप) सौर उर्जेवर चालणारे मोटारपंप लावून गावात पाण्याची पाईपलाईनसुद्धा टाकली जाणार आहे. राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची सोय होणार आहे. त्यापैकी वाशिम, उस्मानाबाद आणि नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्यांमधील काही ठराविक तालुक्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे विशेष. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाक आणि इतर सुविधांसाठी तसेच जनावरांकरिता शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी देशभरातील आकांक्षित जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामसभेचा ठराव घेऊन या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या गाव किंवा वस्तीमध्येच ही योजना मंजूर केली जाणार आहे. योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत/ग्रामसभेची राहणार आहे. मात्र त्या पाईपलाईनवरून आपल्या घरात स्वतंत्र नळ कनेक्शन घ्यायचे असल्यास त्याचा खर्च संबंधित गावातील रहिवाशांना करावा लागणार आहे.योजनेची मागणी करणारा प्रस्ताव ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेकडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक शाखेकडून या योजनेचा आराखडा तयार केला जाईल. तो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. तेथून मान्यता मिळाल्यानंतरच ही योजना त्या गावात अंमलात आणली जाईल, असे तांत्रिक विभागाचे उपअभियंता एस.आर.माटे यांनी सांगितले. या योजनेची माहिती व जनजागृती होण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.असे आहेत निवडीचे निकषस्वजल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गाव, वस्ती हागणदारीमुक्त असली पाहीजे. कमीत कमी १० घरांची लोकवस्ती आवश्यक, यापूर्वीची कोणतीही नळ पाणी पुरवठा योजना गावात नको. केंद्रीय भूजल बोर्ड यांचेकडून सुरक्षित ठिकाण घोषित केलेल्या स्त्रोतांवर ही योजना घेणे बंधनकारक राहणार आहे. लोकवर्गणी आणि देखभाल दुरूस्ती निधीकरिता बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागेल.१० टक्के लोकवर्गणी आवश्यकया योजनेत एका गावासाठी साधारणत: ५ लाखांपासून ४५ लाखांपर्यंतच्या खर्चाच्या आराखड्याला मंजुरी मिळू शकते. या खर्चात ४५ टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ४५ टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. याशिवाय १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून गोळा करणे आवश्यक आहे. ज्या गावाची लोकवर्गणी गोळा करण्याची क्षमता नसेल त्या गावात ग्रामकोषातून किंवा आमदार-खासदार फंडातून ही रक्कम भरण्याची सोय केली जाऊ शकते.सौर उर्जेतून चालणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा जास्तीत जास्त लाभ गडचिरोली जिल्ह्याला मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे या योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्याचा लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना निश्चितपणे होऊन त्यांची शुद्ध पाण्याची समस्या दूर होईल.- अशोक नेते, खासदार, गडचिरोली

टॅग्स :Waterपाणी