शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोनसरी लोहप्रकल्पासाठी लवकरच जमिनीचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:34 IST

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि.या कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या लोहप्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे आता महिनाभरात भूसंपादन केले जाणार आहे.

ठळक मुद्देमुदत संपणार : एमआयडीसीने वळते केले एसडीओंकडे पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड एनर्जी लि.या कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या लोहप्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे आता महिनाभरात भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पात ३८ शेतकऱ्यांची ५१.३२ हेक्टर आर जमीन जात आहे.शेतकऱ्यांकडून घेतल्या जात असलेल्या जमिनीची किंमत, ३ टक्के संयुक्त मोजणी खर्च, ६ टक्के महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) देखभाल खर्च आदी पकडून लॉयड्स कंपनीकडून एमआयडीसीला ६ कोटी ८६ लाख ६९ हजार ८१८ रुपये घेणे होते. त्यापैकी ८५ लाख रुपये कंपनीने आधीच भरले होते तर उर्वरित ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये फेब्रुवारीच्या सुरूवातीस एमआयडीसीकडे भरले होते. मात्र शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यासाठी ते पैसे एमआयडीसीने दोन दिवसांपूर्वी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वळते केले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांना ठरलेला मोबदला देऊन ती जमीन लॉयड्स मेटलकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या मे २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांनी कोनसरी लोहप्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल असे त्यांनी सांगितले होते. मात्र या प्रकल्पासाठी शासनाकडून राबविली जात असलेली प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी किती वर्षात होणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. येत्या १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री पुन्हा गडचिरोलीत येत असल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला पुन्हा गती येईल, अशी आशा आहे.कुटुंबातील एकाला मिळू शकते नोकरीएकरी ५ लाख याप्रमाणे शेतजमिनीचा मोबदला मिळणार आहे. याशिवाय त्या जमिनीत असलेली विहीर, झाडे, शेततळे आदींसाठी वेगळा मोबदला दिला जात आहे. शेतकऱ्यांनी यासोबतच कुटुंबातील दोन सदस्यांना स्थायी नोकरीची मागणी केली होती. त्यापैकी एका सदस्याला प्रकल्प सुरू झाल्यानंतर नोकरी देण्याचे कंपनीचे व्यवस्थापक गणेशकुमार बिंजोला यांनी मान्य केले होते. याशिवाय जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना या प्रकल्पातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन एक वर्षात न केल्यास नियमानुसार त्यांना त्या पैशावरील व्याजही द्यावे लागणार आहे. एमआयडीसीकडून आता पैसे प्राप्त झाल्यामुळे तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जाईल.- नितीन सदगीर, उपविभागीय अधिकारी, चामोर्शी