शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून विदर्भातला माणूस मुंबईतही व-हाडी बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:14 IST

पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे.

- मनोज ताजने गडचिरोली : पूर्वी मुंबई-पुण्याकडे विदर्भातला माणूस आपल्या व-हाडी ठसक्यात बोलायला कचरत असे. चुकून तोंडातून एखादा शब्द व-हाडी निघाला तरी समोरची व्यक्ती त्यांना हिणवत असे. पण आता विदर्भाच्या व-हाडी भाषेने मुंबईसह महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कोणी व-हाडी ठसक्यात बोलताना न्युनगंड बाळगत नाही याचा आनंद वाटतो, असे मनोगत प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कार्यक्रमासाठी गणेशपुरे सोमवारी गडचिरोलीत आले असताना लोकमतशी बोलत होते. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशपुरे यांनी आतापर्यंत ४० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांत, टीव्हीवरील अनेक मराठी मालिकांत आणि रिअ‍ॅलिटी शो मध्ये काम करताना मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विदर्भातच राहिले असल्यामुळे व-हाडी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मुंबईत अभिनयक्षेत्र गाजवत असतानाही त्यांनी आपला व-हाडी बाणा सोडलेला नाही. अनेक टीव्ही शो किंवा विशेष कार्यक्रमांमध्ये व-हाडी भाषेचा वापर ते आवर्जून करताना दिसतात.बोलण्यात एखादा व-हाडी शब्दप्रयोग झाला तरी हिणवल्या जाणाऱ्या १५ वर्षांपूर्वीच्या काळात कॅमेरासमोर व-हाडीचा सर्रास वापर करण्याची हिंमत कशी केली, या प्रश्नावर गणेशपुरे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत कोल्हापुरी, सांगली-साता-याकडील वेगळा टोन सर्रास वापरला जात असताना विदर्भाची व-हाडी मात्र त्यांना माहीतच नव्हती. त्यामुळे मी जाणीवपूर्वक व-हाडीचा वापर करत आलो. विनोदी भूमिका साकारताना व-हाडीतून केलेले विनोद प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे व-हाडीचा वापर करताना पूर्वी अनेकांना वाटत असलेला न्युनगंड आता दूर झाला आहे. विदर्भातील मूळचे रहिवासी असलेले अनेक अधिकारी आता मुंबईत बोलताना व-हाडीचा वापर बिनदिक्कतपणे करत असल्याचे त्यांनीच आपल्याला सांगितले, असे गणेशपुरे म्हणाले.पूर्व विदर्भातल्या झाडीपट्टी रंगभूमीला कित्येक वर्षांची नाटकांची समृद्ध परंपरा आहे. आता तर मुंबई-पुण्यापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीची ओळख झाली आहे. मला पण झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करायला आवडेल, पण अलिकडे शेड्युल व्यस्त असते. त्यामुळे सलग तारखांमध्ये नाटकाचे बुकिंग असेल तर झाडीपट्टी रंगभूमीवर निश्चित काम करणार, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत कितीही व्यस्त असलो तरी गावाची ओढ कमी होत नाही. सण-उत्सवाच्या काळात आवर्जुन पावलं गावाकडे वळतात. विशेषत: महालक्ष्मी पूजनासाठी दरवर्षी अमरावतीला येण्यासाठी माझे दिवस राखीव असतात, असेही गणेशपुरे यांनी सांगितले.