शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

... तर शेतकऱ्यांना जंगलालगतची शेती ठेवावी लागणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात लाेकांमध्ये वाघांची दहशत सुरू झाली. दिवसेंदिवस हा धाेका कमी हाेताना दिसत नाही. मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आहे. वनविभागाने शेतकऱ्यांसाठी याेग्य उपाययाेजना न केल्यास वनालगतची शेती पडिक राहण्याची शक्यता आहे.गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून वाघ, बिबट तसेच अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून मानवावर हल्ले हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. सुरुवातीला आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात, त्यानंतर गडचिराेली तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांनी कहरच केला.  २७ जानेवारी २०१९ पासून १४ मे २०२२ पर्यंत एकूण ३० लाेकांचा बळी वाघ व बिबट्यांनी घेतला. २०२२ मध्ये २० जानेवारी राेजी आरमाेरी तालुक्यातील कुरंझा येथील इसमाला वाघाने ठार केले तर याच वर्षी १३ व १४ मे राेजी अरसाेडा व आरमाेरी येथील महिला व पुरुषाला वाघाने त्याच्याच शेतात ठार केले. उन्हाळ्यात जंगल शुष्क असतानाही वाघाने लपूनछपून हल्ले केले. आता तर वनराई बहरली आहे. पेरणीपूर्व मशागतीला सुरुवातही झाली आहे. अशास्थितीत शेतकरी शेतात भीती मनात ठेवूनच जात आहेत. त्यातही ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे व त्याच परिसरात वाघाची दहशत आहे, अशा ठिकाणी जाण्यास शेतकरी धजावत नाही. मागील वर्षीसुद्धा बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगतची शेती पडिक ठेवली.

काेणकाेणत्या गावातील शेतकऱ्यांना धाेका?गडचिराेली व वडसा वनविभागातील शेतकऱ्यांना वाघाच्या हल्ल्याचा सर्वाधिक धाेका आहे.

-    गडचिराेली तालुक्यातील जेप्रा-दिभना परिसरातील पाच गावे,धुंडेशिवणी परिसर चुरचुरा, कुऱ्हाडी, महादवाडी, गाेगाव तसेच टेंभा चांभार्डा, मरेगाव, अमिर्झा कळमटाेला, आंबेटाेला, आंबेशिवणी, राजगाटा-    आरमाेरी तालुक्यातील सिर्सी, गणेशपूर, इंजेवारी, कुरंझा, देलाेडा, अरसाेडा तसेच कासवी परिसर देसाईगंज तालुक्यातील कुरूड, काेंढाळा, शिवराजपूर परिसर आदी गावांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक धाेका आहे.

आतापर्यंत किती बळी? गडचिराेली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वाघ-बिबट्यांनी आतापर्यंत ३० लाेकांचा बळी घेतला. वाघांनी २५ लाेकांना ठार केले तर बिबट्यांनी ५ लाेकांचा बळी घेतला. बिबट बळींमध्ये  चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहान मुलांचाही समावेश आहे. चालू वर्षात एकूण ५ बळी वाघांनी घेतले. यामध्ये आरमाेरी तालुक्यातील तीन तर देसाईगंज तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चार पुरूष व एक महिला ठार झाली.

 

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ