शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:47 IST

चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देवायगाव येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी (जि.गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. एक विद्यार्थी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असून इयत्ता दहावीचा विद्यार्थी धम्मदीप सुनील रामटेके (१६) रा. येल्ला याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रितिक घनश्याम गुडी (१५) रा. पानोरा पो. धामनगाव ता. गोंडपिपरी व अतुल संजय कुद्रपवार (१५) रा. पानोरा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. रितिक गुडी व अतुल कुद्रपवार या दोघांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर रात्री १.४५ वाजता रितिक गुडी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काही वेळातच अतुल कुद्रपवार याचाही मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर अतुल हा मृतावस्थेतच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर धम्मदीप सुनील रामटेके रा. येला ता. मुलचेरा या विद्यार्थ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वायगाव येथे मिलींद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था नवरगाव ता. सिंदेवाहीद्वारा संचालित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २४ मुले निवासी राहतात. हे विद्यार्थी डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांनी रूग्णालयात धाव घेतली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या या दोन्ही विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. या घटनेने सामाजिक विभागासह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.वसतिगृहात सोयीसुविधांचा अभावगेल्या २५ वर्षांपासून हे वसतिगृह सुरु असून या वसतिगृहात अद्यापही बेडची व्यवस्था नाही. सदर वसतिगृहाची इमारतही जुनी व कौलारू आहे. या वसतिगृहात केवळ दोन खोल्या आहेत. शौचालय व बाथरूमची व्यवस्था आहे. मात्र या वसतिगृहाला संरक्षण भिंत नाही. बेड नसल्याने येथील विद्यार्थी खाली गादीवर झोपतात. शासनाच्या निकषानुसार या वसतिगृहात सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत असते. मात्र या वसतिगृहाकडे सामाजिक न्याय विभागाचे तसेच संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.सखोल चौकशी करावसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे व मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.