जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या मरपल्लीत वसाहतीकरिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वखर्चाने झोपड्या उभारून निवासाची सोय केली अहे. जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वसाहतीच्या जागेचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून वनविभागाकडे प्रलंबित आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी मिळाली. परंतु कर्मचाऱ्याची वसाहतीचे बांधकाम जागेअभावी रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याबाहेर किरायाने खोली घेऊन राहावे लागत आहे. जिमलगट्टा पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी वसाहत मंजूर आहे. परंतु जागा उपलब्ध नसल्याने त्याचे बांधकाम रखडले आहे. कर्मचारी गावात किरायाने खोली घेऊन राहतात. परंतु त्यांच्या जीवाला बाहेर राहण्याने धोका होण्याची शक्यताही असते. तसेच कर्मचाऱ्यांना आपल्या मुलामुलींना शिक्षणाच्या सोयीसुविधा या भागात उपलब्ध नसल्याने बाहेरगावी ठेवावे लागते व अनंत अडचणी येतात. जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर अतिदुर्गम भागात मरमपल्ली पोलीस ठाणे २००४ मध्ये सुरू करण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणी कर्मचारी वसाहत नाही. कर्मचाऱ्यांना कुटुंबासह राहण्यासाठी स्वत: १५ ते २० हजार रूपये खर्च करून कुडाचे घर तयार करावे लागत आहे. शासनाकडून कर्मचारी वसाहतीसाठी मंजुरी मिळाली आहे. मरपल्ली येथे वसाहत निर्माण करण्यास दोन एकर जागासुध्दा उपलब्ध झाली आहे. मरपल्ली भागात दळणवळणाची सोय नाही. या ठिकाणी दूरसंचार विभागाने जाळेही पसरविलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या गावी कुटुंबीयांशी संपर्क करण्यास अडचणी येतात. पोलीस उन्हाळा व पावसाळ्यात कुडाच्या घरामध्ये राहूनच नक्षलविरोधी मोहिमा राबवितात.
मरपल्लीत पोलिसांनी बांधल्या झोपड्या
By admin | Updated: January 20, 2015 22:35 IST