शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:43 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : तीन वर्षात १० हजार कुटुंबांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २४ हजार लाभार्थी आहेत. टप्प्याटप्प्याने घरकूल उपलब्ध करून दिले जात आहेत. मागील तीन वर्षात सुमारे १० हजार ३३२ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. घरकूल मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसातच पहिला हप्ता मंजूर केला जातो. या रकमेतून लाभार्थ्याने घरकूलाच्या बांधकामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा राहते. मात्र बरेच लाभार्थी घरकूलाचा पैसा इतर कामावर खर्च करतात. परिणामी पहिल्या हप्त्यातून पायव्याचेही बांधकाम होत नसल्याचे बऱ्याचवेळा दिसून येते. मागील तीन वर्षात सुमारे ९ हजार २९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या निधीनुसार बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता दिला जातो.दुसºया हप्त्यानंतर तिसरा व अंतिम हप्ता म्हणून चवथा हप्ता दिला जातो. घराचे पूर्ण निरिक्षण केल्याशिवाय चवथा हप्ता दिला जात नाही. एकूण १० हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ७१४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, ४ हजार १६ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता व १ हजार ४१३ लाभार्थ्यांना चवथा हप्ता देण्यात आला आहे. तर ९ हजार ४७ घरकुलांच्या बांधकामाला अजुनही सुरूवात झाली नसल्याचे दिसून येते.निम्म्याहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत२०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २४ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी केवळ १० हजार लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणखी १४ हजार लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षात उर्वरित लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर ‘ड’ यादीत नवीन लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केली जात आहेत. यामध्ये जवळपास ४० ते ५० हजार लाभार्थी राहणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून द्यायचे असेल तर दरवर्षी घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट १० हजारांच्या जवळपास असणे आवश्यक आहे. मात्र केंद्र शासन दरवर्षी दीड ते दोन हजार घरकूल मंजूर करीत आहे. या गतीने घरकुलांचे बांधकाम झाल्यास २०३० पर्यंत सुध्दा सर्व नागरिकांना घरकूल उपलब्ध होणार नाही.

टॅग्स :government schemeसरकारी योजना