शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला घात; वर्षभरापासून बेपत्ता तरुणीचा सांगाडाच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 13:18 IST

पंप हाऊसच्या विहिरीत फेकला होता मृतदेह

ठळक मुद्देप्रियकर पसार, साथीदाराला अटक

देसाईगंज (गडचिरोली) : तब्बल दहा महिन्यांपूर्वी गायब झालेल्या युवतीच्या हत्येला अखेर वाचा फुटली आहे. तिच्या प्रियकरानेच आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर युवती कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी होती.

या प्रकरणात प्रियकराला हत्येसाठी मदत करणाऱ्या मित्राला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असून, प्रियकर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (२०) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती. यादरम्यान १० ऑगस्ट २०२१ला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलिसांकडे केली होती.

सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे देसाईगंज येथील तुषार ऊर्फ तरुण राजू बुज्जेवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ऐश्वर्याच्या गायब होण्यामागील रहस्य उघड केले. घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह काढण्यात आला. तिची बॅगही झुडूपातून काढली. युवतीचे साहित्य, चप्पल आणि जिन्स पॅन्टवरून वडिलांनी तिची ओळख पटविली.

प्रियकराला सोडवायचा होता तिचा ससेमिरा

या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पटले याचे देसाईगंजमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. ऐश्वर्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. पण संदीप तिला टाळत होता. ऐश्वर्या आपला पिच्छा सोडत नाही हे पाहून त्याने तिचा ससेमिरा कायमचा सोडविण्यासाठी तिलाच संपवण्याचे ठरविले.

भिंतीवर डोके आपटले; नंतर गळा आवळला

आरोपी तुषार बुज्जेवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgadchiroli-acगडचिरोली