लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील उसेवाडा येथील मासे कादू दुर्वा ही महिला प्रसुतीसाठी सुमारे ३५ किमी अंतर पार करून लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाली होती. सदर मातेने १६ सप्टेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र तिच्या गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नाईलाजास्तव प्रसुतीनंतर अवघ्या सहाव्या दिवशी सदर मातेला तब्बल ३५ किमीचे अंतर पायी चालत जाऊन गाव गाठावे लागले.महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेली गावे जंगलांनी व्यापली आहेत. या परिसरात रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील सीमेलगतचे नागरिक व महिला लाहेरी येथे उपचारासाठी येतात. उसेवाडा येथील मासे दुर्वा या महिलेचे दिवस जवळ आल्याने तिला नजीकच्या आरोग्य केंद्रात भरती होणे आवश्यक होते. सदर महिला व तिच्या नातेवाईकांनी सुमारे ३५ किमी अंतर पायीच गाठले.प्रसूतीनंतर नवजात बाळ व त्याच्या मातेला रुग्णवाहिकेने घरापर्यंत पोहोचवून देण्याचा नियम आहे. मात्र तिच्या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका नेणे कठीण होते. त्यामुळे सदर मातेने कोणतीही तक्रार न करता दि.२२ सप्टेंबरला डोक्यावर सामानाचे ओझे व गोंडस बाळाला घेऊन माता व तिचे नातेवाईक पायीच निघाले.भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पायदळ प्रवास केल्याशिवाय पर्याय राहात नाही. आरोग्याची समस्या असलेल्या व्यक्तीचे तर हाल होतात. त्यामुळे रस्त्यांची सुविधा होणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक गावातील महिलांचे हेच हाल आहेत.मासे दुर्वा हिचा अंगावर शहारे आणणारा प्रवास१६ सप्टेंबर रोजी ती प्रसूत झाली. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी ती गावाकडे पायदळ निघाली. डोक्यावर सामानाचे ओझे व गोदेत बाळ घेऊन तिने ३५ किमी अंतर गाठले. प्रसूती झाल्यानंतर सदर महिलेला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र मासे दुर्वा या मातेचा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रस्त्यांची गरज आहे.
प्रसुतीनंतरही सहाव्या दिवशी तिने पायीच गाठले छत्तीसगडमधील स्वत:चे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेली गावे जंगलांनी व्यापली आहेत. या परिसरात रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील सीमेलगतचे नागरिक व महिला लाहेरी येथे उपचारासाठी येतात. उसेवाडा येथील मासे दुर्वा या महिलेचे दिवस जवळ आल्याने तिला नजीकच्या आरोग्य केंद्रात भरती होणे आवश्यक होते. सदर महिला व तिच्या नातेवाईकांनी सुमारे ३५ किमी अंतर पायीच गाठले.
प्रसुतीनंतरही सहाव्या दिवशी तिने पायीच गाठले छत्तीसगडमधील स्वत:चे गाव
ठळक मुद्देलाहेरीत झाली होती प्रसुती : डोक्यावर सामानाचे ओझे अन् कुशीत बाळ